धाराशिव: अवैध तंबाखु पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल विक्रेत्यावर कारवाई कधी?

Spread the love



धाराशिव जिल्ह्यात
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-महादेव राजाराम हजारे, वय 37 वर्षे, रा.देवकुळी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.05.11.2025 रोजी 19.10 वा. सु.देवकुरुळी येथे आपल्या माळी हॉटेलच्या बाहेर पानटपरीत महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला तत्सव पदार्थ  डायरेक्टर स्पेशल पान मसाला, तंबाखु पॉकेट एकुण 900₹ किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द कलम- कलम 6 (अ),24 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादन जाहितरातीस प्रति व वाणिज्य पुरवठा विनीमय अधिनियम 2003 अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.



धाराशिव शहरात देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. लहान लहान टपरी चालकावर कारवाई होत आहे. मात्र होलसेल गुटखा व्यापाऱ्यावर कारवाई होत नाही. धाराशिव शहरातील प्रत्येक शाळा जवळ टपऱ्यामध्ये गुटखा विक्री सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी होलसेल गुटखा विक्री करणाऱ्या वर कारवाई होणे गरजेचे आहे. लहान लहान टपऱ्यावर कारवाई झाल्याने पुन्हा त्याच ठिकाणी गुटखा विक्री होते. शाळांच्या बाजूला सुरू असलेल्या गुटका विक्रीमुळे शाळेत शिकणाऱ्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!