धाराशिव : दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५ वार बुधवार रोजी विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श प्राथमिक आश्रमशाळा शिंगोली ता. जि. धाराशिव शाळेच्या संयुक्त विद्यमाने “संविधान दिन” साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सर्व प्रथम पालक व माता पालक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संविधान उद्देशिकाने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नाकर पाटील सरांनी करीत संविधान हे लोककल्याणकारी असून स्वातंत्र्य, समता, बंधुता व एकता हे मुलभूत हक्क व कर्तव्य संविधानाने बहाल केले असे गौरव उद्गार काढले. सतिश कुंभार सरांनी भारतीय संविधान हे लाख मोलाचा ग्रंथ असुन त्याच्या मुळे देशाचे सरकार चालते म्हणून संविधानाचे कौतुक केले.शाळेतील मुलांनी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले होते यात प्रामुख्याने मराठी,इंग्रजी व गणित विषयाचे सादरीकरण अप्रतिम झाले. शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा साहित्य पालकांना अतिशय सुंदर वाटले. या कार्यक्रमात ६० पालक सहभागी झाले होते. पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.
विद्यार्थी उपस्थिती, गुणवत्ता, शालेय क्रीडांगण पाहून समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमानंतर महात्मा जोतिबा संशोधन केंद्र व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य,नागपूर (महाज्योती) यांनी प्रतिवर्षाप्रमाणे JEE, NEE, MHT, CET 2027 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री.विकास राठोड साहेब,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,धाराशिव प्रमुख अतिथी स्नेह ग्राम विकास संस्था देवताळा ता.औसा जि.लातूर संस्थेचे सचिव तथा माध्यमिक मुख्याध्यापक श्री.आण्णासाहेब चव्हाण ,प्राथमिक मुख्याध्यापक सतिश कुंभार उपस्थित होते.या कार्यक्रमात पन्नास विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात आले. याप्रसंगी साधन व्यक्ती मा. शुभम मस्के,करिअर ॲकॅडमी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर पाटील सरांनी तर आभार दिपक खबोले सरांनी मानले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास शानिमे, खंडू पडवळ,श्रीमती बालिका बोयणे, श्रीमती ज्योती साने, चंद्रकांत जाधव, दिपक खबोले,सुधीर कांबळे, सचिन राठोड, प्रशांत राठोड, ज्योती राठोड, श्रद्धा सुर्यवंशी, सुरेखा कांबळे, शेषेराव राठोड, मल्लिनाथ कोणदे, इरफान शेख व शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सुर्यवंशी, रेवा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.