इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांचा नवा फंडा, 100 LED वाटप…!

Spread the love



धाराशिव : नगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांनी नवा फंडा राबवायला सुरुवात केली आहे  100 एलईडी वाटप, स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

चार वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासक आहेत. यावेळी माजी नगरसेवक यांच्यासह निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. निवडणूक होणार म्हणून अंदाज लागल्याने व निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांनी 100 एलईडीचे प्रभागामध्ये अमिष दाखविण्यास सुरुवात केली आहे. चार वर्षांपासून धाराशिवचा कसल्याही प्रकारचा विकास न झाल्याने विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये वाद सुरू असताना अनेक इच्छुक उमेदवारांनी नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी म्हणून 100 एलईडी स्ट्रीट लाईट लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नवीन इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. प्रभाग एक ते वीस मध्ये स्वखर्चाने अनेक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या उमेदवारांनी या प्रकारची कामे करायला सुरुवात केली आहेत.

धाराशिवचे नागरिक हुशार झाले असून अशा कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाहीत, सध्या तरी असेच वाटते. चार वर्षांमध्ये कोविड-19 संपल्यानंतर नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे, मात्र यावेळी अनेक माजी नगरसेवक, समाजसेवा करणारे व स्वतःला समाजसेवक म्हणणारे निवडणुकीसाठी तयार असणारे उमेदवार मदतीला धावले नाहीत. त्याचा नागरिक वेळेवर बरोबर हिशेब करतील, असेच प्रत्येक वर्गातील नागरिकांसह काम करणाऱ्या विरोधी उमेदवाराचे म्हणणे आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!