धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक

Spread the love


तेर (ता. धाराशिव) :
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला.


या वेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या तसेच स्थानिक राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणुकीसंदर्भात पक्षाची ध्येय-धोरणे, निवडणूक रणनीती व प्रचाराची दिशा याबाबत आमदार कैलास पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


ही निवडणूक पक्षाच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येकाने प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि पूर्ण ताकदीने काम करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून सक्रियपणे कार्यरत राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस तेर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!