पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश

Spread the love


धाराशिव : खामगाव (ता. जि. धाराशिव) येथील प्रेमराज संपत गव्हाणे यांनी केवळ 21 व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात 8 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे खामगावसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.
घरची नाजूक आर्थिक परिस्थिती असतानाही आणि साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा असलेल्या प्रेमराज गव्हाणे यांनी जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी अभ्यास सुरू ठेवत स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली.
या त्यांच्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रेमराज गव्हाणे यांचे यश हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
या वेळी सिद्धिविनायक मल्टी स्टेटचे उपाध्यक्ष बालाजी कोरे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, अभय शिंदे आदी उपस्थित होते.
प्रेमराज गव्हाणे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!