कनगरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवकांचा जाहीर प्रवेश

Spread the love

धाराशिव : तालुक्यातील कनगरा येथे देवानंद इंगळे व गोविंद ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली गुंड सतीश, दिनेश इंगळे, मनोज धाराव, इस्माईल शेख, तायाप्पा जाधव, अविनाश गायकवाड, जगदीश कोळी, ओंकार इंगळे, नितीन बनसोडे, विकास गायकवाड, समीर फकीर, दत्ता ढोबळे, राजेंद्र कोळी, विकास कोळी, आप्पा इंगळे, माऊली इंगळे, अभिमन्यू माने, महबूब शेख, लहूराज जाधव, लखन सुरवसे, धनंजय गायकवाड, पप्पू शेख आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश कार्यक्रम जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे, संजय देशमुख, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, व्यंकट भाऊ गुंड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्व नवनियुक्त शिवसैनिकांचे आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना परिवारात स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशामुळे कनगरा गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला भक्कम व निर्णायक बळ मिळणार असल्याचा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी विविध पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!