तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर

Spread the love



तुळजापूर : तुळजापूर तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी आपल्या मागील सहा महिन्यांचा सविस्तर कार्यअहवाल उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. या कार्यअहवालामध्ये तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जबाबदाऱ्या तसेच पक्षविस्ताराच्या उपक्रमांचा तपशीलवार आढावा देण्यात आला आहे.

मागील सहा महिन्यांत पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका भक्कम करण्यासाठी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. बूथस्तरावर कार्यकर्त्यांची बांधणी, प्रचार यंत्रणेचे नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि विविध बैठका घेऊन पक्षाची ताकद वाढवण्याचे काम त्यांनी केल्याचा उल्लेख कार्यअहवालात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, तुळजापूर तालुक्यातील तब्बल साठ गावांमध्ये शिवसेनेचे संघटन पोहोचवण्यात यश आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागात शाखा विस्तार, युवक व महिला आघाडीचे संघटन मजबूत करणे, तसेच स्थानिक प्रश्नांवर पाठपुरावा करण्याची भूमिका यामुळे पक्षाची पकड अधिक बळकट झाल्याचे सांगितले जात आहे.

कार्यअहवाल सादर करताना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी अमोल जाधव यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. “पुढील काळात मी तुझ्यासोबत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी घेतलेल्या परिश्रमांची दखल घेतल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी अमोल जाधव यांनी पक्षप्रमुखांचे आभार मानत संपूर्ण तुळजापूर तालुक्यात शिवसेनेचा विस्तार अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. “तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.

या भेटीमुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसेना संघटनाला नवे बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!