समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love


धाराशिव  : समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजपच्या विचारधारा, विकासाभिमुख धोरणे आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश केल्याचे अमीर शेख यांनी यावेळी सांगितले.


या प्रवेशप्रसंगी नगराध्यक्ष विनोद गंगणे, सुनील चव्हाण, नितीन काळे, माजी सभापती सचिन पाटील, आनंद कंदले, नळदुर्गचे उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निहाल काझी, अमर दाजी हंगरगेकर, माजी सरपंच शंकर गोरे, मोहसीन बागवान, रहमान काझी, अभिजीत लोके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अमीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत करत संघटन बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन केले. या प्रवेशामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!