राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ९ मध्ये भव्य आरोग्य शिबिर

Spread the love


धाराशिव :
शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वरोग निदान व फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर नगरसेविका सौ. रूपाली सुनील आंबेकर, नोहिद शेख तसेच समस्त समता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून लाभ घेतला. शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, फिजिओथेरपी उपचार तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ३५० नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, गटनेते श्री. खलिफा कुरेशी, नगरसेवक व शहराध्यक्ष बबलूभाई शेख, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉ. अविनाश तांबारे, मनीषाताई पाटील, जिजाऊ जन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षा अनिताताई पाटील, माजी नगरसेविका साळुंखेताई, सुनील आंबेकर, डॉ. पूजा मॅडम, युवक तालुकाध्यक्ष अमर गुंड, नगरसेवक नरसिंह मिटकरी, तेजस देवकते, नगरसेवक सर्फराज कुरेशी, युवक शहराध्यक्ष रणवीरजी इंगळे, पंकज नाना भोसले, नोहिद शेख, डॉ. वाकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक तसेच नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!