२९ ऑगस्टला मुंबईला न येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पाडा – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Spread the love

धाराशिव : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे.

याच अनुषंगाने आज (५ ऑगस्ट) धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जो नेता २९ ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा.”

या बैठकीत मनोज पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजाने एकसंघ राहण्याचे आणि २९ ऑगस्टच्या आंदोलनात सामूहिक सहभागाची गरज व्यक्त केली. व मोठ्या संख्येने मुंबईला सगळ्यांनी निघावे कोणतीही कारण न देता सर्वांनी मुंबईला निघावे व घरच्यांना सांगून ठेवा. त्या काळामध्ये या ठिकाणी दिसेल जो दिसेल त्यावर लक्ष ठेवा व त्या सर्व नेत्यांना निवडणुकीत पाडा

मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा संदेश देणारे असून, आगामी निवडणुकांवर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!