ढोकी (ता. धाराशिव): तेरणा ज्युनिअर कॉलेज, तेरणानगर, ढोकी येथे प्रा. विजय सुरू सरांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात ३२ वर्षांची अभूतपूर्व सेवा बजावलेल्या विजय सरांचा सन्मान संस्थेचे प्राचार्य संजय पाटील सर यांनी सपत्नीक पारंपरिक वेशभूषेत, फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला.
या भावपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विशेष उपस्थितीत प्रा. नरेंद्र वीर, प्रा. घाटे, प्रा. लोंढे, प्रा. विलास पडवळ, प्रा. सुनिता पाटील मॅडम, वरिष्ठ लिपिक मगर सर यांचा समावेश होता. तसेच, आदर्श आश्रम शाळा शिंगोलीचे मुख्याध्यापक सतीश शहाजी कुंभार व शाळेचे माजी विद्यार्थीही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सेवाभावी कार्याच्या स्मृती जपत, विजय सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.