धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक 95 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत , पोलीस निरीक्षकांनी लाच घेतल्याने जिल्ह्यात खळबळ!

Spread the love

धाराशिव (25 जून 2025) – धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज मोठी कारवाई करत पोस्टे धाराशिव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारोती शेळके (वय 54) आणि महिला मपोना मुक्ता लोखंडे (वय 34) यांना 95 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याने लाँच घेतली त्यामुळे जिल्हा मध्ये इतर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. जिल्ह्यात काम करणारा सर्वच पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारदार महिला (वय 48) यांचा मुलगा एका गुन्ह्यात अडकलेला असून, त्यास मदत करण्याच्या मोबदल्यात या दोघांनी मिळून एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. यामध्ये पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांनी तक्रारदारास मुक्ता लोखंडे हिच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज 25 जून रोजी शासकीय पंचासमक्ष धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहासमोर सापळा कारवाई राबवण्यात आली. यामध्ये तडजोडीनंतर निश्चित झालेली ₹95,000 लाचरक्कम तक्रारदार महिलेकडून स्वीकारताना मुक्ता लोखंडे हिला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर त्वरित तिची आणि पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांची अंगझडती व घरझडती घेण्यात आली.

या तपासात मुक्ता लोखंडे यांच्या ताब्यातून ओपो कंपनीचा मोबाईल, बजाज मोटारसायकल, चावी व ओळखपत्र जप्त करण्यात आले. तर, पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांच्या ताब्यातून विवो व मोटोरोला कंपनीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सदर मोबाईल उपकरणांचे फॉरेंसिक विश्लेषण सुरू आहे.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुक्ता लोखंडे यांच्यावर कलम 7 व 7 अ

तर मारोती शेळके यांच्यावर कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला जात आहे.

ही कारवाई पोस्टे आनंदनगर, धाराशिव येथे नोंदवली जात आहे.

सदर सापळा कारवाई श्री. योगेश वेळापुरे (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांना बाळासाहेब नरवटे (पोलीस निरीक्षक, लाप्रवि धाराशिव) यांनी सहकार्य केले. यावेळी पथकात पोलीस अंमलदार नागेश शेरकर व शशिकांत हजारे यांचाही समावेश होता.

या संपूर्ण सापळा कारवाईस पोलीस अधीक्षक श्री. संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मुकुंद अघाव (छ. संभाजीनगर) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

नागरिकांसाठी आवाहन:

कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा:

 टोल फ्री क्रमांक: 1064
 पोलीस उप अधीक्षक, धाराशिव: 02472-222879


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!