(फोटो AI )
Dharashiv :
धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जोरदार हजेरी लावली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, ज्वारीसह इतर उभ्या पिकांवर आणि फळबागांवर या नैसर्गिक संकटाचा गंभीर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी गारपिटीमुळे पिके अक्षरशः जमिनीवर आडवी पडली असून, शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेले आहेत..
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन विलंब न करता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी केली आहे..
दरम्यान, हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता आहे..
शेतकरी बांधवांनी काढणी केलेली पिके उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्री व इतर साधनांनी व्यवस्थित झाकून ठेवावीत, थोडेसे दुर्लक्षही मोठे आर्थिक नुकसान ठरू शकते, याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे..
दरम्यान, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव जनावरांची काळजी घ्यावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली उभे राहणे टाळावे. तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, याची दक्षता घ्यावी असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत केलं आहे.
https://www.facebook.com/share/p/1C96UoN3gx/
