शिंगोली (ता. धाराशिव) – बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वज्ञानाने जनतेच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे रयतेचे राजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती साने मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रद्धा सूर्यवंशी मॅडम उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, प्रशांत राठोड, वैशाली शितोळे मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात अध्यक्ष ज्योती साने मॅडम यांनी शाहू महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंची जाणावा” या उक्तीप्रमाणे शाहू महाराजांनी सर्व समाजघटकांना समान संधी देण्यासाठी शिक्षण, जलव्यवस्था, वसतीगृहे, कलेचा विकास यासारख्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली.
प्रमुख पाहुण्या श्रद्धा सूर्यवंशी मॅडम म्हणाल्या की, शेतकरी, मजूर, दलित व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक उपाययोजना राबवल्या. ‘ज्ञानगंगा’ घरा-दारी नेली. असा राजा इतिहासात दुर्मिळ आहे, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमासाठी दिपक खबोले, खंडू पडवळ, चंद्रकांत जाधव, विशाल राठोड, सचिन राठोड, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, सुधीर कांबळे, शेषेराव राठोड, मुख्याध्यापक सतीश कुंभार, सुरेखा कांबळे, ज्योती राठोड, बालिका बोयणे, गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, वसंत भिसे, सचिन अनंतकळवास आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.