ढोकी (ता. धाराशिव) | अंतरसंवाद न्यूज
तेरणा साखर कारखाना प्रशाला, तेरणानगर (ढोकी) येथे कार्यरत असलेले पर्यवेक्षक श्रीराम पांडुरंग लिंगे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त प्रशालेच्या वतीने दिनांक 23 जून 2025 रोजी त्यांच्या सपत्नीक सन्मानाचा सोहळा आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक विष्णुदास आहेर, एस.डी. कुंभार, मुख्याध्यापक संजय पाटील, वसंत भोरे, रेखाताई कदम, बालाजी तांबे, अंकुश दांगट आदी शिक्षकांनी लिंगे सरांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून दिली.
तसेच ग्रामपंचायत ढोकीचे उपसरपंच अमोल (पापा) समुद्रे, राजेंद्र पाटील, दादाहरी पाळवदे, शहाजी जाधव, हनुमंत कोळपे यांच्यासह प्रशालेचा संपूर्ण शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि लिंगे सरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लिंगे सरांनी आपले संपूर्ण कार्यकाळ इमानदारी, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी अर्पण केला. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सर्वांनी त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.