धाराशिव पोलिसांची उपयुक्त सेवा : हरवलेली कागदपत्रे नोंदविण्यासाठी नवा ऑनलाईन टॅब सुरू

Spread the love

धाराशिव : जिल्हा पोलिस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण सेवा सुरू केली असून, नागरिक आता हरवलेली कागदपत्रे ऑनलाईन नोंदवू शकणार आहेत. धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘हरवले/सापडले लेख’ या नवीन टॅबचा समावेश करण्यात आला आहे.

नागरिकांनी हरवलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तसेच इतर महत्त्वाचे कागदपत्र यासंबंधीची माहिती थेट या टॅबमार्फत नोंदवता येईल. ही सेवा वापरण्यासाठी नागरिकांनी https://dharashiv.mahapolice.gov.in/lost-found या लिंकवर भेट द्यावी.

जिल्हा पोलिस दलाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष न जाता हरवलेली कागदपत्रे ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे वेळ, कागदपत्रांची सुरक्षा आणि शोध प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

जिल्हा पोलिस दलाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, हरवलेली कागदपत्रे किंवा वस्तू आढळल्यास संबंधित माहिती सदर टॅबद्वारे नोंदवून सहकार्य करावे, जेणेकरून त्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवता येतील.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!