धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील बालाजी नगर परिसरात बेकायदेशीरपणे जंगलातून तोडलेली चंदनाची झाडे विक्रीसाठी आणल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 17 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरोपी नामे शहाजी लिंगाप्पा माळी, तात्यासाहेब अर्जुन खंडागळे (वय 35, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर), व शिवाजी विठ्ठल सुरवसे (वय 60, रा. बालाजी नगर, धाराशिव) यांनी बालाजी नगर येथे शिवाजी सुरवसे यांच्या घरासमोर विना परवाना व बेकायदेशीर रित्या जंगलातून तोडलेली चंदनाची झाडे चोरून मोटारसायकल (क्र. एमएच 13 डीव्ही 0623) वर वाहतूक करताना आढळून आले.
या प्रकाराबाबत पोलीस हवालदार रंजना नागनाथ टोम्पे (पोलीस ठाणे, धाराशिव शहर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 303(2) सह वृक्षतोड अधिनियमाचे कलम 3, तसेच भारतीय वन अधिनियम 1972 चे कलम 41 व 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संबंधित मोटारसायकल व चंदन जप्त केले असून, अधिक तपास सुरू आहे.