तुळजापूरमध्ये ऑनलाईन फसवणूक : नागरिकाची तब्बल 16 लाख 85 हजारांची फसवणूक

Spread the love

तुळजापूर (प्रतिनिधी) : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून तुळजापूर तालुक्यातील एका नागरिकास तब्बल १६ लाख ८५ हजार ४९८ रुपये ऑनलाईन फसवणुकीत गमवावे लागले आहेत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवार पेठ कणे गल्ली, तुळजापूर येथील कालीदास लिंबाजी गवळी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलासह त्यांना जास्त पैशांचे आमिष दाखवण्यात आले. शासनाने ऑनलाईन गेमवर बंदी आणलेली असतानाही exchange.com या नावाने लिंक तयार करून त्यांना ती लिंक मोबाईल क्रमांक 9091915891, 9561463808, 8485017490, 8766406507, 8446223584, 8010781839, 8446964554, 73918220088 यावरून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवण्यात आली.

या लिंकच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादी व त्यांच्या मुलाची तब्बल ₹16,85,498/- इतक्या रकमेची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी फिर्यादी कालीदास गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी भा.दं.वि. कलम 420, 356(2) सह कलम 66(सी) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!