विनापरवाना ड्रोन वापरणाऱ्यांवर कारवाई होणार – पोलीस अधीक्षकांचा इशारा

Spread the love

धाराशिव :
धाराशिव जिल्ह्यात विनापरवाना ड्रोन वापरणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. दि. 04 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, मीटिंग हॉल, धाराशिव येथे जिल्ह्यातील ड्रोन धारक, फोटोग्राफर व माध्यम प्रतिनिधींसोबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस जिल्ह्यातील खाजगी आणि शासकीय फोटोग्राफर, यूट्यूब मीडिया प्रतिनिधी, कॅमेरामन, ड्रोन ऑपरेटर आणि जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की, DGCA (Director General of Civil Aviation) कडून परवानगी, लायसन्स व युनिक आयडेंटिफिकेशन नंबर घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना व बिनधास्त ड्रोन वापर केल्यास सार्वजनिक आणि खासगी सुरक्षेला धोका निर्माण होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर नो-फ्लाय झोनमध्ये – म्हणजेच महत्त्वाची शासकीय आस्थापने, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे तसेच VIP दौऱ्यांवेळी ड्रोन वापरणे पूर्णपणे निषिद्ध आहे. अत्यावश्यक असल्यास संबंधित अधिकृत विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

राजकीय कार्यक्रमांमधील ड्रोन वापराबाबतही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. अनधिकृत ड्रोन वापरामुळे संभाव्य धोके, शासकीय मालमत्तेची सुरक्षितता आणि सामान्य नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन यापुढे अशा घटनांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

या बैठकीला पोलीस विभागाचे अधिकारी, विविध माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार, ड्रोन ऑपरेटर, कॅमेरामन आणि जनसंपर्क कार्यालय धाराशिव येथील अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!