धाराशिव : विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून चिकित्सक अभ्यासाची सवय निर्माण व्हावी, त्यांना स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयार करता यावे, यासाठी ऋगवेद हेल्थ फाउंडेशनतर्फे “डायमंड टॅलेंट शोध परीक्षा” उपक्रम राबविण्यात आला.
या परीक्षेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे, परीक्षेची भीती दूर करणे, तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची मजबूत पायाभरणी करणे हे होते. प्रा. राहुल गायकवाड आणि प्रा. निलोफर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “दुर्गम भागातील तांडा, वाडी, वस्त्यांवरील आश्रमशाळांमधील विद्यार्थीदेखील जिल्हाधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी होऊ शकतात, फक्त त्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा देण्याची गरज आहे.”
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगून, त्यांच्या मनातील भीती दूर केली गेली. आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, विशाल राठोड, सचिन राठोड, सुरेखा कांबळे, आणि श्रद्धा सूर्यवंशी यांनी प्रा. गायकवाड व प्रा. शेख यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार केला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण करणारा ठरला.