धाराशिव तालुक्यातील उपळा येथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा चपखल वापर करीत सोयाबीन उत्पादकता वृद्धी वृद्धी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा देशातील पहिला सोयाबीन वृद्धी प्रकल्प आहे. सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रकल्पास भेट देऊन कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व तज्ञांसोबत प्रकल्पाचा आढावा घेतला.
धाराशिव जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी प्रकल्प राबविण्याचा निर्णय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला होता. त्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात १७ मे रोजी आमदार पाटील यांनी भेटही दिली होती. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व इतर तज्ञांसोबत सखोल चर्चा केली होती. त्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या तांत्रिक सहकार्याने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
उपळा शिवारात श्री. भागवत विठ्ठल घोगरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी हवामान केंद्र व मृदा सेन्सरचा शुभारंभही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत हवामान आधारित (Weather-Based) व मृदा संवेदक आधारित (Soil Sensor-Based) २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० शेतकरी हवामान आधारित तर १० शेतकरी मृदा संवेदक आधारित आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. ‘फुले स्मार्ट PDMA’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, सिंचन, रोग-कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन आदी मार्गदर्शन दिले जात आहे. BBF पद्धतीने पेरणी, ड्रोनद्वारे पिकांचे परीक्षण व फवारणी, ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन पद्धतींचा वापर, अशा विविध मानकांचा आधार घेऊन शेती सल्लाही दिला जात आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसोबत बैठक घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर आमदार पाटील यांनी शेतीतून उत्पन्न वाढवा असे आवाहन केले. अडचणी आल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, ड्रोनचा वापर फक्त फवारणीपुरता मर्यादित न ठेवता पीक निरीक्षणासाठीही करावा, असेही नमूद केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आसलकर, तालुका कृषी अधिकारी श्री. देवकते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. पेरके, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे हवामान तज्ञ श्री. हारवाडीकर यांच्यासह अनेक अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ड्रोनचा वापर अनिवार्य
शेतीमध्ये पुढील काळात ड्रोनचा वापर अनिवार्य होणार आहे. फवारणी बरोबरच पिकांचे निरीक्षण करण्यासाठी फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. यावर आधारित वेळोवेळी योग्य औषधे, त्यांचे प्रमाण व इतर मार्गदर्शन शेतकऱ्यांना याठिकाणी दिले जाणार आहे.
‘व्हॉट्सअॅिप’ ग्रुपवर नियंत्रण व मार्गदर्शन
प्रकल्पात सहभागी शेतकरी व संबंधित अधिकारी यांचा एक व्हॉट्सअॅशप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाईल. तसेच दिलेल्या सूचना व कार्यवाहीचे ट्रॅकिंग करण्यात येणार असून, त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन व नियंत्रण प्रभावीपणे करता येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
- आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे , वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
- ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधी
- अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज – प्रा.ॲड.मंजुषा साखरे
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
- वाशी पोलिसांची धाडसी कारवाई; पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अफू लागवड प्रकरणी कारवाईनंतर समाधान उघडे यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुकवर घोषणा
- खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग , धाराशिवच्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी महत्वाचे पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात





























































