आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!

Spread the love


धाराशिव : डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस, धाराशिव येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व श्री. करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषध निर्माण व हेल्थकेअर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील Irise Healthcare Limited व Infinix VTI Limited, Pune  या औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या कॅम्पस ड्राईव्हमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी औषध निर्माण क्षेत्रातील विविध रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केले. या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 70 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्रे (Appointment Letters) प्रदान करण्यात आली.
या यशस्वी उपक्रमासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री. विजय सुतार तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!