राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक

Spread the love

सुरज (महाराज) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यादेवी जयंती उत्साहात

धाराशिव (प्रतिनिधी): राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वैराग रोड येथील देवकते गल्ली परिसरातून भव्य-दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. लोकसभा सह-संपर्कप्रमुख धाराशिव सुरज (महाराज) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली.मिरवणुकीची सुरुवात देवकते गल्ली येथून करण्यात आली. त्यानंतर विजय चौक, नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारुती आदी प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला.या मिरवणुकीत धनगर समाजातील असंख्य बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, धार्मिक व लोककल्याणकारी योगदानाचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले असून, उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मिरवणुकीला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!