धाराशिव शहरातील प्रसिद्ध बस स्टॉप: ना बसण्यासाठी जागा, ना सावली!

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात बस सेवा सुरू झाल्यापासून दैनंदिन बाजाराजवळील देशपांडे कॉर्नर ( देशपांडे स्टॅन्ड ) परिसर हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा थांबा बनला आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे बसची वाट पाहतात. मात्र, या ठिकाणी बस स्टॉप असला तरी सुविधा शून्य आहेत.

प्रवाशांसाठी बसण्यासाठी बाक नाही, सावलीसाठी शेड नाही आणि पावसाळ्यात तर भिजण्यापासून बचाव करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. उन्हाळ्यात जळजळीत ऊन आणि पावसाळ्यात मुसळधार पावसाचा सामना करत प्रवाशांना तासन्तास उभे राहावे लागते.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून या ठिकाणी हीच परिस्थिती असून, प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे
एसटी प्रवाशांनी प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की, या ठिकाणी बसण्यासाठी बाक, सावलीसाठी शेड आणि आवश्यक सुविधा उभाराव्यात, जेणेकरून प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि बस प्रवासाचा अनुभव सुखकर बनेल.

#DeshpandeBusStand #देशपांडेबसस्टॅन्ड
#धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवबसस्टॉप #बसस्टॉपफॅसिलिटी #उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज
#Dharashiv #Osmanabad #DharashivBusStop #BusStopFacility #OsmanabadNews #DharashivNews


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!