स्पेलिंग बी स्पर्धेत आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचा उत्साहपूर्ण सहभाग

Spread the love

धाराशिव : जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, शाहूनगर, उपळा (मा.) येथे केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा परीक्षा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत केंद्रातील विविध शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दलेखन कौशल्याचे प्रदर्शन करून स्पर्धा रंगतदार केली.

या स्पर्धेत आदर्श प्राथमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाशजी पारवे, केंद्रप्रमुख सुकेशनी वाघमारे, केंद्रिय मुख्याध्यापक शेषेराव राठोड, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब शिंदे, रणजीत तुपारे, पायाळ सर, पांचाळ सर, पोतदार सर आणि प्रकाशजी पवार यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्दसंपदा आणि उच्चारकौशल्यात वाढ होऊन आत्मविश्वास वृद्धिंगत झाला, असे आयोजकांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!