तुळजापूर भवानी मंदिर संवर्धन : मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राजकीय वादालाही मिळाला नवा कलाटणी

Spread the love

तुळजापूर भवानी मंदिर संवर्धन : माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; राजकीय वादालाही मिळाला नवा कलाटणी

तुळजापूर – श्री तुळजा भवानी मंदिर व संकुल जतन, संवर्धन आणि विकास आराखड्याबाबत महत्त्वाची बैठक आज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता संवर्धनाची दिशा ठरवण्यावर भर देण्यात आला. मंदिराच्या कळस व गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) आणि आयआयटी तज्ज्ञांचा सविस्तर अहवाल पुढील 30 दिवसांत तयार करण्याच्या सूचना शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री शेलार म्हणाले की, “कुलस्वामिनी तुळजा भवानी मंदिर हे धार्मिक, सांस्कृतिक आणि परंपरागत दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान या तिन्हींचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जाईल. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेतला जाईल.”

या बैठकीस आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, धाराशिव जिल्हाधिकारी श्री. पुजारा, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ. तेजस गर्गे, मंदिराचे महंत, पुजारी तसेच भारतीय पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राजकीय गोंधळ आणि वाद

या कामासंदर्भात बैठकीसाठी तीन वेळा पत्रव्यवहार झाला. सुरुवातीच्या पत्रात पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे होती. मात्र, दुसऱ्या पत्रामध्ये त्यांची नावे वगळण्यात आली. या पत्रावरूनच 17 ऑगस्ट रोजी आमदार कैलास पाटील आणि खासदार-आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दे मांडले.

काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापूर मंदिराला भेट दिल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. त्यानंतर आमदार-खासदारांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील संघर्ष उफाळून आला. खासदार निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत एक व्हिडिओ दाखवत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली होती, तर भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचे खंडन केले होते.

खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांची पत्रकार परिषद

आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित होते का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण या बैठकीची माहिती मंत्री आशिष शेलार यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रसिद्ध झाली आहे.

भाजप पदाधिकारी यांची पत्रकार परिषद..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!