नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात – सोमनाथ गुरव यांची माहिती

Spread the love

धाराशिव ता. 19: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे, अंडरपास आणि सर्विस रोडची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून प्रत्यक्षात काम सुरु झाले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, मकरंद राजेंनिंबाळकर यांचे नागरिकांतून आभार व्यक्त होत असल्याच ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे.


राष्ट्रीय महामार्ग होऊनही अनेक कामे झालेली नव्हती. त्यामुळे जनतेला वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. या मागणीनुसार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात, दिशा समितीच्या बैठकीत त्यांनी अनेकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधले. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार भेटी घेतल्या. तसेच आमदार कैलास पाटील यांनीही याबाबत सर्व पातळीवर पाठपुरावा केला. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी हा प्रश्न लावून धरला होता. याचबरोबर नागरिकांनीही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून या कामाची गरज दाखवून दिली. अखेर लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि नागरिकांच्या आंदोलनानंतर या सर्व कामाना मंजुरी मिळाली पण कामे काही होत नव्हती. वाढते अपघात पाहता पुन्हा हे काम होण्यासाठी प्रयत्न करावे लागले. सर्विस रोड, पथदिवे व अंडरपास आदी कामे न झाल्याने काही महिन्यांपूर्वी अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त झाला त्यांनी मोठं आंदोलन करून प्रशासनावर दबाव वाढविला. शिवाय लोकसभेच्या अधिवेशनात खासदार ओमराजे यांनी व आमदार कैलास पाटील यांनीही विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.

साहजिक तेव्हापासून त्या अनुषंगाने कामे हाती घेतली गेली आता अंडरपासच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. सध्या मार्गावर सर्विस रोड व पथदिवे बसविण्यात आले असून अंडरपासच्या कामालाही सुरुवात झाल्याने नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.जुना उपळा रोड या ठिकाणी अंडरपास ची मागणी प्रस्तावित असून त्यासाठीही पाठपुरावा सुरु असल्याची माहिती सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. नागरिकांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे आभार सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केले आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!