कोंड गटातून रोहिणी क्षिरसागर यांच्या उमेदवारीची चर्चा; नंदू भैया क्षिरसागर यांचे कार्य ठरतेय बळ

Spread the love



धाराशिव – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील विविध गटांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोंड जिल्हा परिषद गटातून नंदकिशोर उर्फ नंदू भैया क्षिरसागर यांच्या पत्नी रोहिणी नंदकिशोर क्षिरसागर या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नंदू भैया क्षिरसागर हे धाराशिव तालुक्यातील परिचित सामाजिक कार्यकर्ते असून गेल्या काही वर्षांपासून त्यांनी तालुक्यातील अनेक गावांशी दृढ संपर्क ठेवत विकासकामांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती स्तरावर विविध शासकीय योजनांमधून नागरिकांना मदत करून त्यांनी जनतेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.



इरला गण मधून त्यांच्या आई चंद्रकला हरिदास क्षिरसागर या मागील पंचवार्षिक काळात पंचायत समिती सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे राबविण्यात आली होती. या कामगिरीचा फायदा आता क्षिरसागर परिवाराला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नंदू भैया क्षिरसागर यांचा मित्रपरिवार आणि स्थानिक कार्यकर्त्यांमधील मजबूत जनसंपर्क हे या संभाव्य उमेदवारीचे मोठे बळ मानले जात आहे. मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या आग्रहास्तव लवकरच एक मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश घेणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे कोंड गटातील आगामी निवडणुकीत क्षिरसागर परिवाराचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!