भोसले हायस्कूलसमोरील घटना — प्रत्यक्ष पाहणी करून दिलासा
धाराशिव :
धाराशिव शहरातील भोसले हायस्कूलसमोर घडलेल्या दुर्दैवी घटनेत बाळासाहेब थिटे यांच्या घरावर भलेमोठे झाड कोसळले. या अपघातात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
घटनेची माहिती मिळताच मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी थिटे कुटुंबीयांची सविस्तर विचारपूस करत नुकसानाचा आढावा घेतला.
संकटाच्या या काळात आपण थिटे कुटुंबीयांसोबत उभे आहोत, असे सांगत पाटील यांनी वैयक्तिक पातळीवर तसेच भारतीय जनता पक्ष, धाराशिव शहराच्या वतीने आर्थिक मदत केली.
या वेळी राहुल काकडे, अमित पडवळ, आकाश तावडे, सुजित साळुंके यांच्यासह धाराशिव शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तात्काळ मदतीमुळे अधिक मोठी हानी टळली असल्याचेही सांगण्यात आले.