धाराशिव बसस्थानक प्रकरण उघडकीस; विभागीय स्थापत्य अभियंता लाच घेताना रंगेहात अटक – एसटी कामांमधील भ्रष्टाचाराची नवीन मालिका?

Spread the love

धाराशिव | 22 जुलै 2025
धाराशिव जिल्ह्यातील एसटी विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या अनेक विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असावा, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज एक मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत उबाळे यांना 9,000 रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली.

 काय आहे प्रकरण?

धाराशिव बसस्थानकाजवळ गुत्तेदारास पार्किंगजवळील शटर बंद करण्यासाठी आणि वाहनतळ जागेचा ताबा मिळवून देण्यासाठी शशिकांत उबाळे यांनी एकूण 15,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 5,000 रुपये आधीच घेतले गेले असून, उर्वरित 10,000 पैकी 9,000 रुपये स्वीकारताना ते सापळ्यात सापडले.

六‍ वरिष्ठ अधिकाऱ्याचा थेट संबंध?

तक्रारीनुसार, या पैकी 5,000 रुपये हे ‘डीसी साहेब’ म्हणजेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, आणि उर्वरित रक्कम शशिकांत उबाळे यांनी स्वतःसाठी मागितली होती. यामुळे आता केवळ अटक झालेल्या अभियंत्यापुरते प्रकरण मर्यादित न राहता, वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचा सहभाग देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

 अटकपूर्व पडताळणी:

18 जुलै 2025 रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर पडताळणी करत उबाळे यांनी डीसी साहेबांसाठी 5,000 आणि स्वतःसाठी 4,000 अशी लाच स्वीकारण्यास तयार असल्याचे कबूल केले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बसस्थानक आवारात सापळा रचत उबाळे यांना रंगेहात अटक केली.

️ जिल्ह्यातील इतर कामांवरही संशय:

धाराशिव जिल्ह्यातील एसटी विभागामार्फत अनेक मोठी कामे सुरू असून, या कारवाईनंतर संपूर्ण विभागातील कामकाजाची शंकास्पद पारदर्शकता व दर्जा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की, जिल्ह्यात झालेल्या सर्व एसटी कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी व लाचखोर अधिकार्‍यांची संपूर्ण मालमत्तेची चौकशी व्हावी.

‍ मंत्री सरनाईक यांचा आदेश:

धाराशिव बसस्थानकाबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आधीच चौकशीचे आदेश दिले होते. मात्र कारवाई होण्याआधीच एक अधिकारी लाच घेताना अडकवल्यामुळे हे प्रकरण अधिकच गहिरे झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!