

धाराशिव – उमरगा | दिनांक: 22 जुलै 2025
आज उमरगा येथील Jio-BP Reliance पेट्रोल पंपावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक रहिवासी सादिक कारचे यांची KIA Seltos गाडी, ज्यामध्ये केवळ 50 लिटर क्षमतेची डिझेल टाकी आहे, त्या गाडीत तब्बल 56.33 लिटर डिझेल भरल्याचा दावा त्यांनी केला आहे.
茶 पंप मशिन आणि कॅश मेमोवरून मिळालेल्या माहितीप्रमाणे डिझेलचा दर ₹91.42 प्रति लिटर असून, एकूण रक्कम ₹5149.69 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे, इंधन भरल्यानंतर गाडीत अजूनही 10-12 लिटर डिझेल भरण्याची जागा शिल्लक होती, असा थरारक आरोप त्यांनी केला आहे.
類 स्थानिक नागरिकांमध्ये संताप
या प्रकारामुळे गावात चांगलाच खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी अशी मागणी केली आहे की, संबंधित पंपावर योग्य ती चौकशी करण्यात यावी आणि डिझेल मशीनच्या कॅलिब्रेशनची अधिकृत तपासणी करण्यात यावी.
ग्राहक सादिक यांचा सवाल:
> “माझ्या गाडीची टाकी 50 लिटरची आहे, तर मग 56 लिटर डिझेल कसं काय बसू शकलं? याचा अर्थ मी फसवणुकीचा बळी ठरलो का?”
✍️ अंतरसंवाद न्यूजचा सवाल?
इंधन पंप मशीनचे कॅलिब्रेशन नियमीतपणे तपासले जाते का?
ग्राहकांकडून दररोज असं अघोषित पद्धतीने लुट करण्यात येते का?
जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी !