जिल्हाधिकाऱ्यांकडून ॲट्रॉसिटी प्रकरणांचा आढावा : २०२४-२५ मध्ये १२१ गुन्ह्यांची नोंद

Spread the love

धाराशिव, दि. ३ जून – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी कायदा) अंतर्गत जिल्ह्यातील प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुख्य अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अशफत आमना, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक संचालक पंडित जाधव, व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकरणे निकाली काढण्यावर भर

जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की, “ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलद तपास करून त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. पीडितांना त्वरित मदत दिली जावी आणि समाजात कायद्याची जनजागृती व्हावी.”

२०२४-२५ मध्ये १२१ गुन्हे नोंद

सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ अखेर एकूण १२१ गुन्हे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये:

४ खून

६६ जातीवाचक शिवीगाळ

२५ विनयभंग

१४ बलात्कार

१२ इतर गुन्हे

प्रलंबित व निकाली प्रकरणांचा तपशील

मार्च २०२५ अखेर ४० प्रकरणांचा पोलीस तपास सुरू होता. त्यातील १७ प्रकरणांमध्ये ६० दिवसांची मुदत संपलेली असून त्यापैकी ११ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल झालेले नव्हते. एप्रिल २०२५ मध्ये एकूण १४ नवीन प्रकरणांची नोंद झाली.

न्यायालयात दाखल दोषारोपपत्रे: ७८
प्रलंबित पोलीस तपास: २६
निकाली काढलेली प्रकरणे: १७

एप्रिल २०२५ मध्ये घडलेली १४ नवीन प्रकरणे:

८ जातीवाचक शिवीगाळ

२ विनयभंग

२ बलात्कार

२ इतर गुन्हे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!