धाराशिव, दि. ३ जून (प्रतिनिधी):
धाराशिव शहरातील वैराग नाका परिसरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले कत्तलखाने आज सकाळी संयुक्त कारवाईत निष्कासित करण्यात आले. पोलीस विभाग, महसूल प्रशासन आणि नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने सकाळी १० ते १२ दरम्यान ही कारवाई राबवली.
शहर हद्दीतील सर्वे नं. ४२९ येथे गोपनीय माहितीच्या आधारे कार्यवाही करण्यात आली. गौवंश तस्करी व अनधिकृत कत्तलखाने चालवणाऱ्या गटांनी उभारलेली चार ठिकाणांची संरचना पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईत JCB, ट्रॅक्टर व पोलीस बंदोबस्ताची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
ही महत्त्वपूर्ण कारवाई धाराशिव शहर पोलीस निरीक्षक शकील शेख, नायब तहसीलदार श्री. शिंदे, आणि नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत कर्मचारी आणि आवश्यक यंत्रणाही कार्यस्थळी उपस्थित होते.
या संयुक्त मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक मा. शाफकत आमना, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. ही कारवाई शहरात बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल मानली जात आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अशा कारवायांचे सत्र पुढेही सुरू राहणार असून अनधिकृत धंद्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




#धाराशिव #PoliceAction #IllegalSlaughterHouse #धाराशिवपोलीस #LawAndOrder #गोरक्षण #AntarsanwadNews
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप




















