धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव शहरातील खाजा नगर परिसरातील प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळेत आज पर्यावरणपूरक उपक्रम पार पडला. समाजसेवक असलम सय्यद यांच्या सौजन्याने शाळेला विविध प्रकारची झाडे भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व पर्यावरण संरक्षण याची जाण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
शाळेच्या आवारात झाडे लावण्याच्या उद्देशाने ही भेट देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी स्वतः झाडे लावून त्यांची जोपासना करण्याची शपथ घेतली. असलम सय्यद यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याची जबाबदारी घेऊन त्याचे संगोपन केले पाहिजे. हीच खरी पर्यावरण सेवा आहे.”
या कार्यक्रमाला प्रियदर्शनी शाळेच्या इनामदार मॅडम, सत्यभामा माध्यमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी ठरले असून, परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.