सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरु करावीत हमीभाव केंद्रे – आमदार कैलास पाटील यांची मागणी

Spread the love

धाराशिव :
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचा विचार करून तात्काळ सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरु करावीत, तसेच हमीभावापेक्षा कमी किंमतीत विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे केली आहे.

आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी जमीन खरडून गेल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

“हमीभाव ५३२८ रुपये जाहीर असून, सध्या बाजारभाव ३८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. व्यापारी शेतकऱ्यांकडून ३००० ते ३५०० रुपयांत सोयाबीन खरेदी करत आहेत,” असे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान सरकारने हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेद्वारे फरकाची रक्कम देण्याची घोषणा केली होती, त्या घोषणेची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

“दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यात भावांतराची रक्कम जमा करण्यात यावी,” असे त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!