गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात : कराड-लातूर बस पलटी, २५ प्रवासी जखमी

Spread the love

विडियो…


लातूर, दि. ४ जून :
रामेगाव आणि मुरुड अकोला (ता. अहमदपूर) दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर कराडहून लातूरकडे येणारी खासगी बस आज (मंगळवार) रात्री आठ वाजेच्या सुमारास पलटी झाली. या भीषण अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीने सरकारी रुग्णालय, लातूर येथे हलवण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे हा अपघात घडला आहे. मात्र, संबंधित गुत्तेदाराकडून रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे ‘डायव्हर्जन’चे बोर्ड, रेडियम पट्ट्या, वा काम सुरू असल्याचे इशारे देणारे फलक लावण्यात आले नव्हते. या निष्काळजीपणामुळे अपघात टाळता आला नाही, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; गुत्तेदाराचा मनमानी कारभार सुरूच

या महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे गुत्तेदार मनमानीपणे काम करत आहेत.
रस्त्याचे योग्य नियोजन, सुरक्षेची खबरदारी, दिशादर्शक फलक यांची संपूर्णपणे वानवा असून, यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या निष्काळजीपणामुळे भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!