विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांचे श्री तुळजाभवानी देवी दर्शन

Spread the love


📍 तुळजापूर | दि. 3 जून 2025
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यांनी सहकुटुंब देवीची मांजरी आरती अनुभवली व देवीचा आशिर्वाद घेतला.

महाराजांच्या उपस्थितीने मंदिर परिसरात भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले वातावरण निर्माण झाले. अनेक भाविकांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंदिर संस्थानच्या चालू आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती देखील जाणून घेतली.

गहिनीनाथ औसेकर महाराज हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांच्या आगमनानिमित्त मंदिर संस्थानतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.

या दर्शनप्रसंगी त्यांच्या समवेत चिरंजीव श्रीरंग महाराज आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ, भांडारपाल नागेश शितोळे, तसेच इतर कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.




गहिनीनाथ औसेकर, तुळजाभवानी देवी दर्शन, तुळजापूर, वारकरी संप्रदाय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर, महाराष्ट्र कीर्तनकार, ह.भ.प.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!