भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेड, वाशीच्या १२ व्या मोळीपूजन सोहळ्यात उत्साह! आमदार तानाजीराव सावंत देणार ‘विक्रमी’ भाव!

Spread the love


इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा ऊस दर जाहीर होण्याची शक्यता; व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांची ग्वाही


वाशी प्रतिनिधी:
वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथील भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेडच्या १२ व्या गळीत हंगामाच्या मोळीपूजन कार्यक्रमाचा सोहळा आज शेतकरी आणि मान्यवरांच्या उत्साही उपस्थितीत संपन्न झाला. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांच्यासह संचालक मंडळाने विधिवत मोळीचे पूजन केले.
विक्रमी भावाची अपेक्षा: कार्यक्रमादरम्यान बोलताना व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. “आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शुगर मिल्स नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देते. याही वर्षी इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा भाव जाहीर करून आमदार तानाजीराव सावंत शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवतील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही: भैरवनाथ शुगर मिल्समुळे वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला आजवर योग्य भाव आणि न्याय मिळाला आहे. यावर्षी देखील कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज असल्याने कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, असा विश्वास व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत यांनी व्यक्त केला.
शिस्तबद्ध कारभार: मागील अनेक वर्षांपासून भैरवनाथ शुगर मिल्सचा कारखाना योग्य आणि शिस्तबद्ध स्थितीमध्ये सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेवर देता आला आहे, ज्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.


यावेळी कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत, शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, निश्चित चेडे, नागनाथ नाईकवाडी, प्रसाद जोशी, युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शिवहर स्वामी, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, दिनकर शिंदे, अतुल चौधरी, अशोक लाखे, उद्धव साळवी, तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!