धाराशिव जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखू विक्रीविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई; धाराशिव शहरातील डीलरांवर कधी होणार अंकुश?

Spread the love


धाराशिव, दि. ३० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी धडक कारवाई केली आहे. लोहारा, उमरगा, नळदुर्ग आणि तुळजापूर पोलिस ठाण्यांत एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, हजारो रुपयांच्या प्रतिबंधित साहित्याची जप्ती करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या मुख्य शहरात अशी कारवाई कधी होणार आणि लहान टपऱ्या-दुकानदारांवरच कारवाई का होते, तर मोठ्या डीलरांवर अंकुश का लावला जात नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.


लोहारा पोलिसांची कारवाई
लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हिप्परगा रवा येथे योगेश सुरेश जाधव या आरोपीच्या पंक्चर दुकानात तपासणी करण्यात आली. यावेळी केसरयुक्त विमल पान मसाला आणि तंबाखूचे ४५-४५ पुडे, एकूण १३,५०० रुपयांच्या प्रतिबंधित साहित्याची विक्रीसाठी साठवणूक असल्याचे आढळले. पोलिसांनी साहित्य जप्त करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला.


उमरगा पोलिसांची कारवाई
उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.४० वाजता तुरोरी येथील सौदागर किराणा दुकानात साजीद शरीफ चपराशी या २२ वर्षीय आरोपीकडे प्रतिबंधित विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, डायरेक्टर पान मसाला आणि शॉ ९९९ या साहित्याची २,०५९ रुपयांची साठवणूक आढळली. पोलिसांनी साहित्य जप्त करून वरीलच कलमांनुसार गुन्हा नोंदवला.


नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई
नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी पाच आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. यात संतराम भुजंगराम कांबळे (वय ६६, अणदुर) यांच्याकडे केसरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही वन तंबाखूचे २७० रुपयांचे साहित्य; विश्वनाथ राम हांगडे (वय ४८, फुलवाडी) यांच्याकडे केसरमिश्रीत प्रीमियम सुपर जेन पान मसाला, व्ही वन तंबाखू आणि एस.पी.९९९ तंबाखूचे ३९० रुपयांचे साहित्य; मुनाफ अब्दुल शेख (वय ६०, काटगाव) यांच्याकडे केसरयुक्त विमल पान मसाला, गाय छाप तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पान मसाल्याचे ५९५ रुपयांचे साहित्य; शिराज महंमद मुजावर (वय ४५, काटगाव) यांच्याकडे गाय छाप तंबाखूचे ५०५ रुपयांचे साहित्य; आणि सुनिल शंकर तिवारी (वय ३०, काटगाव) यांच्याकडे डायरेक्टर स्पेशल पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला आणि गाय छाप तंबाखूचे ४७५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व प्रकरणांत कलम ६ (ब), २४ सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंध आणि वाणिज्य पुरवठा विनियम अधिनियम २००३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले.


तुळजापूर पोलिसांची कारवाई
तुळजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.२० वाजता सिंदफळ येथील आनंदवन बार अँड हॉटेलजवळील पान शॉपमध्ये हनुमंत बाबुराव माळी (वय ३१) यांच्याकडे डायरेक्टर स्पेशल पान मसाला आणि विमल पान मसाल्याचे ६३२ रुपयांचे प्रतिबंधित साहित्य आढळले. पोलिसांनी साहित्य जप्त करून कलम ६ (अ), २४ सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंध आणि वाणिज्य पुरवठा विनियम अधिनियम २००३ अन्वये गुन्हा दाखल केला.


या कारवायांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध तंबाखू विक्रीला आळा बसण्यास मदत होत असली तरी, धाराशिव शहरात अशी मोठी कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, लहान टपऱ्या आणि दुकानदारांवरच कारवाई होते, पण मोठ्या डीलर आणि पुरवठादारांवर अंकुश का लावला जात नाही? पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  • अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण
    Spread the love बारामती | प्रतिनिधीमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर आता एकच प्रश्न चर्चेत आहे — हा अपघात होता की घातपात? हे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सभेसाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथे जात होते.…
  • ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती
    Spread the loveबारामती | प्रतिनिधीमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते. बारामती विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे विमानाचा अपघात झाल्याचे प्राथमिक स्तरावर समजते. सुरुवातीच्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…
  • वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..
    Spread the loveधाराशिव ता 27: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यासाठी विविध पक्षातील सक्रिय कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यातील दोन दिवसात घेतलेल्या प्रवेशामुळं विरोधकाच धाब दणाणल आहे. सत्ता नसताना सगळीकडे नकारात्मक वातावरण तयार करून सुद्धा संघर्ष करण्यासाठी एक मोठी फळी तयार होत असल्याच सकारात्मक चित्र आपोआप तयार झाले आहे.अनसुर्डा ता. धाराशिव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना…
  • प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
    Spread the loveकळंब : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत तालीम फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी नगर परिषद शाळा क्रमांक १ कळंब या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ७७ डझन रजिस्टर वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. अतिशय चांगल्या दर्जाचे प्रत्येक विद्यार्थ्यांना अर्धा डझन रजिस्टर याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून शिक्षणासाठी नवी प्रेरणा…
  • सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले
    Spread the loveधाराशिव | प्रतिनिधीसोने-चांदीच्या बाजारात आज पुन्हा एकदा भाववाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोन्याच्या दरात आज लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांना किंचित महागाईचा सामना करावा लागत आहे.📈 आज किती वाढ झाली?🔸 22 कॅरेट सोनं:आज प्रति 10 ग्रॅम ₹1,34,000 च्या पुढे गेले असून, कालच्या तुलनेत सुमारे ₹1,800…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!