धाराशिव नगर परिषदेला 140 कोटी निधी मंजूर केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री तानाजी सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांचे आभार माना
निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवाद लाटण्यासाठी थयथयाट कशाला?
शिवसेनेचे धाराशिवचे शहरप्रमुख आकाश कोकाटे यांचा 140 कोटीचे श्रेय घेणाऱ्यांना थेट इशारा
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.
या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते.
परंतु निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याचे भान स्वार्थाचे राजकारण आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे महापाप करणार्यांना राहिलेले नाही. म्हणून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट करणार्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि निधीचा दुरूपयोग करणार्यावर नियमाचा बडगा उगारणारे विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानायचे सोडून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट सुरू केला आहे. पण श्रेयवादासाठी राजकीय पक्षाच्या व त्यांच्या इतर त्यांच्या बगलबच्चांना जनता यावेळेस माफ करणार नाही याचे भान त्यांनी बाळगावे, अन्यथा नगर परिषद निवडणुकीत तुम्हाला एकही जागा पदरी पडणार नाही.
धाराशिव शहरातील नागरिकांची रस्त्यांची गैरसोय लक्षात घेवून विविध भागातील 59 रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री भाई एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांनी तब्बल 140 कोटी रूपयांचा निधी धाराशिव नगर परिषदेकरिता मंजूर केला. म्हणून काही राजकीय मंडळींनी निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
मात्र निधी कोणी खेचून आणला याचे भान मात्र त्या नेत्यांना राहिले नाही. केवळ बॅनरबाजी करून राजकारण चालत नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विचारावर आजही शिवसेना टिकून आहे, हे बॅनर बाजी करणाऱ्यानी लक्षात ठेवले पाहिजे.
धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था करून ठेवलेले उबाठाचे खासदार, आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्ष 140 कोटीच्या निधीवर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपल्या धाराशिवचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांनी सदरील निविदा ही चुकीच्या पद्धतीने केली आहे नियमांचा भंग करून केली आहे
काही राजकीय मंडळींच्या लाडक्या गुत्तदाराला सदर 140 कोटी चे काम मिळावे यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केले आहेत.
तरी देखील ‘गिरे भी तो टांग ऊपर’ या उक्तीप्रमाणे आम्हीच हा निधी मिळवून आणला आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आमच्यामुळेच होणार असा डांगोरा पिटण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत चिखल आणि धुरळ्यात जगणारे धाराशिवकर उताणे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
धाराशिव शहरवासियांना भुयारी गटार योजनेची गरज नसताना शहरातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करून निधीचा धुरळा उडविला. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुरळा सोसत धाराशिवकर खड्डयांमधून आजही वाट काढत आहेत. परंतु जनतेच्या समस्येऐवजी आपला स्वार्थ साधणार्या लोकांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर परिषदेची सत्ता हडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही निवडणूक यावेळेस इतकी सहज-सोपी नाही हे त्यांच्या लक्षात आलेली नाही. म्हणून ऐनवेळी निधी आम्हीच आणला अशा वल्गना करणार्या आणि इतके दिवस झोपा काढणार्यांना एवढेच सांगणे आहे की जर तुमच्यात हिंमत होती तर धाराशिव शहराचा विकास का झाला नाही? विकासाचे श्रेय घेण्यासाठी पुढे या, पण तुम्ही काय दिवे लावले ते आधी जनतेला सांगा आणि मगच जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या.
जनतेने एकदा विश्वास ठेवला म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे उगीच काहीही बरळू नये. धाराशिव शहराचा खरेच विकास करायचा होता तर धाराशिव शहरवासियांना खड्डयांच्या खाईत कोण लोटले? स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी लाटून जनतेला दुर्गंधीत कोण ढकलले? अंतर्गत रस्त्यांवर भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते उकरून लोकांचा बळी घेणारे एकदा तरी लाजले का? स्वतःचे पाप झाकण्यासाठी बगलबच्चांना पुढे करुन आंदोलनाची नौटंकी करणार्यांना अजुनही लाज वाटत नाही का? पिण्याच्या पाण्याचीही बोंब असताना केवळ निधीच्या श्रेयवादावरून प्रत्येकवेळी थयथयाट कशाला? धाराशिवकर जनता सूज्ञ आहे. तुमची नौटंकी जाणून आहे. म्हणून यापुढील काळात निधी कोणी आणला, कोणी दिला यावर भाष्य करण्यापेक्षा जनतेसमोर सत्य मांडा. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जनतेची माथी भडकविण्यापेक्षा स्वतः आपण कोणत्या पायरीवर आहोत याचे भान ठेवा आणि मगच राजकारण खेळा. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारांवर आजचा महाराष्ट्र वाटचाल करतोय. त्याला स्वार्थासाठी खीळ घालण्यापेक्षा स्वतः या मार्गावर या, तरच तुम्हाला राजकारण आणि समाजकारणाचा फरक कळेल आणि धाराशिवच्या विकासात योगदान द्यायचे नसेल तर आडकाठी आणू नका, एवढेच तुम्हाला सांगणे आहे. अशी प्रतिक्रिया आकाश कोकाटे यांनी प्रेस नोट द्रारे दिली आहे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील
- गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ! – मल्हार पाटील
- परिसरात रस्त्यालगत युवकाचा मृतदेह; मृत्यू की खून?
- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.
- मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार; आई तुळजाभवानीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक
- ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
- केशेगावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
- शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकारने मागे घेतल्या
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; माजी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
- जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट त्यासाठी राज्यातील पहिले ‘फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग’ मॉड्युल मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- शालेय व्यवस्थापन समितींमार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा; विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश द्या, अन्यथा आंदोलन – धाराशिव काँग्रेस
- परळी येथील मयत तोहीद खान हत्याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा – सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र
- खोटी ओळख सांगून विद्यार्थ्याची कागदपत्रे घेतल्याचा आरोप; उमरगा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा
- जळकोट येथील भांड्याच्या दुकानातील चोरीचा उलगडा; लातूरमधील सराईत आरोपीसह १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
- तुळजापूर आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
- मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी
- कुक्कुटपालनातून स्वावलंबनाची संधी; पाच दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्जाचे आवाहन
- जाचक अटी शिथिल करून सरसकट कर्जमाफी करा; सरकारला शेतकऱ्यांचा विश्वासघात करू देणार नाही – आमदार रोहित पवार
- स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा









































