धाराशिव,६ जून ( प्रतिनिधी ) या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्षांची लागवड व संगोपन मोहीम राबविण्यात येणार आहे.यामध्ये १९ जुलै रोजी एका दिवसात १५ लक्ष वृक्षांची लागवड करण्यात येणार असून,ही मोहीम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्याचा प्रयत्न राहणार आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना विश्वासात घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आयोजित वृक्ष लागवड व संगोपन मोहिमेच्या आढावा बैठकीत श्री. पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले,विभागीय वन अधिकारी बी.एस.पोळ, सामाजिक वनीकरण उपसंचालक श्री.करे,शिक्षणाधिकारी अशोक पाटील,सुधा साळुंके,उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड,संजय पाटील,नगरपालिका प्रशासनाचे अजित डोके,सांख्यिकी विभागाचे उपसंचालक सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, “वृक्ष लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची पाहणी नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत करावी. लागवडीसाठी लागणारे मनुष्यबळ निश्चित करून त्याची यादी तयार करावी.रोपांची वाहतूक,लागवड साहित्य,पाणी,खत आदी सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.असे त्यांनी सांगितले
१९ जुलै रोजीच्या वृक्ष लागवडीसाठी सकाळी ६ वाजता उपस्थिती नोंदवून, सकाळी ७ वाजतापासून लागवड सुरू करावी.गाव पातळीवर सरपंच, उपसरपंच,सेवाभावी संस्था यांना सहभागी करून ही मोहीम प्रभावीपणे राबवावी.शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा.वृक्ष लागवडीबरोबर संगोपनावरही लक्ष केंद्रित करावे.”असे श्री.पुजार म्हणाले.
डॉ.घोष म्हणाले की,“ग्रीन धाराशिव या मोहिमेअंतर्गत होणारी वृक्ष लागवड ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती करावी.”
श्री.धरमकर यांनी सांगितले की, “वृक्ष लागवडीच्या ठिकाणी पाण्याचे स्रोत, रोटावेटरने मशागत,कंपोस्ट खत आदी तयारी पूर्ण करावी.प्रत्येक गावासाठी ३०० स्वयंसेवक निवडून त्यांची यादी तयार करावी.असे ते म्हणाले.
या आढावा बैठकीस सर्व तहसीलदार,नगरपालिकांचे मुख्याधिकारी,तालुका कृषी अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील
- गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ! – मल्हार पाटील
- परिसरात रस्त्यालगत युवकाचा मृतदेह; मृत्यू की खून?
- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.
- मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार; आई तुळजाभवानीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक
- ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
- केशेगावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
- शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकारने मागे घेतल्या
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; माजी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
- जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट त्यासाठी राज्यातील पहिले ‘फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग’ मॉड्युल मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती






































