10 मे 2025| मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील एसटी महामंडळ आता पर्यावरणपूरक प्रवासाकडे वाटचाल करणार असून येत्या काळात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर धावणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक इंधनासंदर्भात 9 मे रोजी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, पुढील पाच वर्षांत दरवर्षी ५ हजार बसेस अशा एकूण २५ हजार नव्या बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यापैकी २० हजार बसेस या सी.एन.जी. व एल.एन.जी. इंधनावर चालणाऱ्या असून, डिझेल व पर्यायी इंधन यांचे मिश्रण असलेल्या हायब्रीड मॉडेलवर आधारित असतील.
पर्यायी इंधनाचा वापर का गरजेचा?
परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि त्याची उपलब्धता या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन हा काळाची गरज आहे. सी.एन.जी. आणि एल.एन.जी. हे इंधन प्रकार तुलनेने स्वस्त असून, ते पर्यावरणपूरक देखील आहेत. भविष्यात डिझेलचा वापर केवळ आपत्कालीन प्रसंगीच केला जाईल.
इंधन कार्यक्षमतेचा विचार
हायब्रीड इंधनाच्या माध्यमातून बस प्रति लिटर ५ ते ५.५ किलोमीटर अंतर पार करू शकते. याउलट डिझेलवर चालणाऱ्या बसेस केवळ ४ किलोमीटरच अंतर पार करतात. परिणामी इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रण या दोन्ही बाबतीत सकारात्मक परिणाम होणार आहेत.
महत्त्वाचे ठळक निर्णय:
एल.एन.जी. इंधनावर २०% सवलत मिळणार
दरवर्षी २३५ कोटी रुपयांची इंधन बचत अपेक्षित
राज्यभरात ९० ठिकाणी एल.एन.जी. पंप उभारले जाणार
महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेडमार्फत २० सी.एन.जी. पंप उभारले जातील
हायब्रीड बसेस तयार करण्यासाठी बस उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले
या निर्णयामुळे एसटीचा प्रवास अधिक शाश्वत, स्वस्त आणि पर्यावरणपूरक होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
- दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कामाला लागावे; दिरंगाई खपवून घेणार नाही – आमदार कैलास पाटील
- शिंगोली आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन
- सोन्याचे दर १७ हजार रुपयांनी कमी! दहा दिवसांत मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा
- शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या लढ्याला यश; खरीप २०२० च्या पीकविम्याचे २२७ कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा – आमदार कैलास पाटील
- खरीप २०२० प्रकरणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रु. २२६ कोटींचा दिलासा दीर्घ न्यायालयीन लढ्याला यश; राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
- टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त ११० दात्यांचे रक्तदानाने अभिवादन
एक तेरा साथ ग्रुपचा यशस्वी पुढाकार - परांडा तालुक्यातील जवळा-आसू-लोणी रस्त्यासाठी ३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
- मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ४,५०० विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याची आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी!
- अतिवृष्टी असो वा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले राणादादा!
- तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’ शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
- आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रम
- चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- दुष्काळी भागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करा! – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची शासनाकडे मागणी
- एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड… , ई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! – आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
- कचरा डेपो हलविण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, रवी वाघमारे व पंकज पाटील यांचा मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्वाणीचा इशारा!
- ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद
- सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विज कपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
- कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा , ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी
- जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ! 2026
- शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील
- ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणी
- प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार ,ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान
– आमदार राणाजगजितसिंह पाटील - कृषी महाविद्यालय आळणीचा खो-खो संघ उपविजेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी
- पिकांचे १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती व भाजीपाल्याचाही समावेश
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटलांच्या नावाची चर्चा; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत येणार चुरस
- दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- एमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
































