धाराशिव – भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरज वाढली असून कोळगे व कुलकर्णी यांच्यासह अनेक नावे सध्या चर्चेत आहे. पुढील आठवड्यामध्ये ही निवड होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस शिगेला पोहोचली असून, विविध नेत्यांची नावे समोर येत आहेत. पक्षात दीर्घकाळ सेवा केलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले रामदास सुभाषराव कोळगे हे या पदासाठी आघाडीच्या दावेदारांपैकी एक मानले जात आहेत.
रामदास कोळगे हे 1989 पासून भाजपमध्ये सक्रीय असून, त्यांनी युवा मोर्चा, किसान मोर्चा, बजरंग दल, विहिप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांतून कार्य केले आहे. भूम-वाशी तालुक्यात त्यांनी संघ प्रचारक म्हणून एक वर्ष सेवा दिली आहे. 1993 च्या भूकंपात मदतकार्य, अटल पणन समिती व बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून योगदान, तसेच सलग तीन वेळा पंचायत समिती सदस्य व उपसभापती म्हणून कार्यकाल – अशा विविध अंगाने त्यांनी आपली राजकीय वाटचाल सिद्ध केलेली आहे. सध्या समर्थ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले कोळगे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडावी, अशी कार्यकर्त्यांमध्ये मागणी असून, ते नेहमी पक्षाची ध्वजवाहक भूमिका पार पाडत आले आहेत.
दुसरे नाव दत्ता कुलकर्णी यांचे असून ते धाराशिव जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या उद्योग समूह उभा केला असून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक मल्टीस्टेट कॉपरेट सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड ची बँक देखील जिल्हाभरात सर्वेकडे कार्यरत आहे.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजपच्या स्थानिक संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज भासू लागली आहे, आणि यामुळेच कुलकर्णी यांचे ही नाव पुन्हा पुढे आले आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा राजकीय अनुभव
दत्ताभाऊ कुलकर्णी हे धाराशिव जिल्ह्यातील एक अनुभवी आणि प्रभावशाली भाजप नेते आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी यशस्वीपणे पार पाडली असून, पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले असून धाराशिव जिल्ह्यात देखील त्यांचे राजकीय वजन चांगले आहे. झालेल्या लोकसभा व विधानसभेमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून पक्ष त्यांना पुढे मोठी जबाबदारी देईल अशीच भूमिका दिसत आहे.
पक्षातील अंतर्गत चर्चासत्रे
धाराशिव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या जिल्हाध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू आहे. काही कार्यकर्त्यांनी युवा नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली आहे, तर काहींनी अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अधिक स्थिर होईल, असे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे
जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संभाव्य यादी पुढीलप्रमाणे :
रामदास कोळगे, प्रदेश सचिव भाजप किसान मोर्चा
दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष , उद्योजक
संताजी चालुक्य, विद्यमान जिल्हाध्यक्ष
नेताजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
अजित पिंगळे , कळंब
विनोद कपाट, प्रदेश कार्यकारणी सदस्य
व्यंकटराव गुंड, प्रदेश कार्यकारणी सदस्य
संतोष बोबडे, माजी तालुकाध्यक्ष
विजय शिंगाडे, माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष
अनिल काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य
गेल्या वेळेस जिल्हाध्यक्ष पद अंतिम क्षणी संताजी काका चालुक्य यांच्याकडे गेले होते, यंदा मात्र अनेक नावाची प्रबळ चर्चा आहे. मात्र या यादीतील कोणीही जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य ठरू शकतो. त्यामुळे या नेत्यांपैकी किंवा इतर कोणाच्या गळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील






















