राजकारणाचा बळी ठरतोय धाराशिवचा विकास?” – नितेश राणेंच्या गौप्यस्फोटावर टीकेची झोड

Spread the love

धाराशिव, ७ जून – राज्याचे बंदरे व मच्छ व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आपल्या धाराशिव दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. “भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या विधानामुळे धाराशिव जिल्ह्यातील जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय आकसापोटी विकासकामांना ब्रेक लागणे म्हणजे जनतेच्या हितावर घाला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

“धाराशिवकरांनी कुणाच्या राजकीय मतभेदांना दोष न देता विकासासाठी मतदान केले होते. आज मात्र विकास स्थगितीच्या विळख्यात अडकतोय. जर कामे कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली नाहीत म्हणून निधी थांबवला जात असेल, तर हा लोकशाहीचा अपमान आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया समाजातील विविध स्तरांतून उमटत आहे.

याआधीच निधीअभावी अनेक पायाभूत सुविधा खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील प्रलंबित कामांना ही स्थगिती आणखी अडथळा ठरणार आहे, हे स्पष्ट दिसते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!