आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याचा परिणाम; मत्स्य व्यवसायासाठी जिल्हाध्यक्षांनी मांडली ठोस मागणी

धाराशिव- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे शनिवार, ७ जून रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी भाजप कार्यालय, प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य पाटील, ॲड. नितीन भोसले, ॲड. मिलिंद पाटील, अनिल काळे, नेताजी पाटील, विनोद गपाट, अस्मिता कांबळे, नंदाताई पुनगुडे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मत्स्य विभागाला दिलेल्या निवेदनाचा दाखला देत धाराशिव जिल्ह्यातील जलस्रोतांचा उपयोग मत्स्य व्यवसायासाठी प्रभावीपणे व्हावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्ह्यात २२६ जलप्रकल्प, तलाव व जलसंधारण साधनांमुळे मत्स्य व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध आहे. याचा वापर करून जिल्ह्यात बीज प्रक्रिया केंद्रे, प्रशिक्षण सुविधा, आणि कोल्ड स्टोरेज व्यवस्था निर्माण करावी. याबरोबरच ‘येरमाळा स्पेशल मच्छी’सारख्या स्थानिक ब्रँडचे उदाहरण देत त्यांनी त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन केले.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना नितेश राणे म्हणाले, “माझ्या खात्याच्या माध्यमातून जी मदत शक्य आहे ती हक्काने मागा. तुमचा मागणीचा ड्राफ्ट द्या, आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल, ते मी स्वतः पाहीन.” ते पुढे म्हणाले, “माझी पहिली ओळख भाजप कार्यकर्त्याची आहे, मंत्रीपद ही त्यानंतरची भूमिका आहे. मी इथे फक्त दौऱ्यासाठी नाही, तर संघटनात्मक संवाद साधण्यासाठी आलो आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजपचं कमळ शेवटच्या घरोघरी फुललं पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. कार्यकर्ता संवादाच्या माध्यमातून स्थानिक विकास आणि संघटनात्मक बळकटी या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.
- अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण
- ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती
- वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..
- प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले
- शिंगोली आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
- आळणी येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात
- धाराशिव : दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार?
- शिवसेना (उबाठा) गटाला चिलवडीत मोठे खिंडार; माजी उपसभापती शाम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
- कनगरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवकांचा जाहीर प्रवेश
- धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे यांची निवड
- समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश
- गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश
- धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक
- पुढील सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा
काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी
- शंतनू पायाळ यांची खामसवाडी जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणी सुरू
- आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
- राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांची घोषणा , 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी , खर्च मर्यादा…
- राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ९ मध्ये भव्य आरोग्य शिबिर
- आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडोळी येथे शिवसेना UBT ची आढावा व नियोजन बैठक
- धाराशिव – तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
- विलासराव देशमुख यांच्याविषयीच्या वक्तव्याचा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध.डॉ.प्रतापसिंह पाटील
- पराभवाने खचून जावू नका जनतेच्या कामात राहा यश जवळच आहे – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
























