धाराशिव : पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे ४० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी १०० किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. आणि त्यानंतर हे ४० टीएमसी पाणी बीड, धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये वितरित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊ केले असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे..
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुरस्थितींवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना जलसंपत्ती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीतून दरवर्षी वाहून जाणारे अंदाजे ४० टीएमसी पाणी १०० किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे पुराचे पाणी समुद्रात न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागांच्या सिंचनासाठी करणे आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्थेच्या ‘कृष्णा पुरनियंत्रण प्रकल्प ‘ अंतर्गत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून ९६३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, आणि जलवाहिनी प्रणाली सुधारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, पुराचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये वळविण्याची योजना आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प’ बाबत महत्वाची बैठक पुणे येथील महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळ कार्यालयात सोमवार २ जून रोजी पार पडली.बैठकीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी हे अधिकचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार या प्रकल्पाचा ‘प्रकल्प व्यवहार्यता अहवाल'(Feasibility Report) पुढी तीन महिन्याच्या आत सादर करणार असल्याचेहे आमदार पाटील यांनी म्हटले आहेयावेळी कृष्णा खोरे महामंडळचे कार्यकारी संचालक श्री.अतुल कपोले,सचिव वी एम कुलकर्णी,मुख्य अभियंता गुणाले,मुख्य अभियंता धुमाळ,उपसचिव सविता बोधेकर,अधीक्षक अभियंता शिल्पा जाधव (पाणी तंटा लवाद पुणे) अधीक्षक अभियंता कोल्हापूर अभिजीत मेत्रे,कृष्णा मराठवाडा प्रकल्प अधीक्षक अभियंता थोरात,कार्यकारी अभियंता नाईक उपस्थित होते.
मराठवाड्याला ४० टीएमसी पाणी मिळणार.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुळे होणाऱ्या या प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पुरस्थितींवर नियंत्रण करता येणार असून शेत जमिनीचे, पिकांचे व जीविताचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे तर दुसरीकडे बीड, धाराशिव या दुष्काळग्रस्त भागांना ४० टीएमसी पाणी उपलब्ध होऊन लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेती उत्पादनात वाढ.स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवून आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील
- गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ! – मल्हार पाटील
- परिसरात रस्त्यालगत युवकाचा मृतदेह; मृत्यू की खून?
- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.
































