तुळजाभवानी मंदिरात पत्रकारांसाठी पासची मागणी – पत्रकार प्रतिनिधींकडून निवेदन सादर

Spread the love

तुळजापूर (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांना वृत्तांकनासाठी प्रवेश पास देण्यात यावेत, तसेच पत्रकारांच्या ओळखपत्रावर संपादक, नातेवाईक किंवा वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिनीचे कर्मचारी यांनाही प्रवेश मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन मंदिर प्रशासनाला सादर करण्यात आले.

या निवेदनप्रसंगी दूरदर्शन आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. देविदास पाठक, लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स संचारचे जिल्हा प्रतिनिधी व सचिव रवींद्र केसकर, दैनिक स्वराज्याचे जिल्हा प्रतिनिधी व उपाध्यक्ष गोविंदसिंह राजपूत, आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी व कोषाध्यक्ष बालाजी निरफळ, कार्यकारिणी सदस्य बालाजी सुरवसे (साम टीव्ही), ओंकार कुलकर्णी (एनडीटीवी), आप्पासाहेब शेळके (एबीपी माझा), श्रीराम क्षीरसागर (टीव्ही 9 मराठी), काकासाहेब कांबळे (लोकशाही न्यूज), शितल वाघमारे (प्रजापत्र), कैलास चौधरी व अमोल गाडे (दैनिक संचार) आदी पत्रकार उपस्थित होते.

मंदिर परिसरात काम करणाऱ्या पत्रकारांना वारंवार पास घेण्यासाठी होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी, तसेच त्यांचे कार्य सुरळीत पार पडावे, यासाठी मंदिर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा पत्रकार संघटनेने व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!