धाराशिव: येथे स्वस्तिक मंगल कार्यालयामध्ये श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय व फिजिक्सवाला यांच्या संयुक्त विदयमाने एस.एस.सी. बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य कै. के. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यालयाच्या निकालाचा घोषवारा वाचून दाखवला.
आपल्या प्रास्ताविकामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी संस्थेची १९६२ पासून आजपर्यंतची वाटचाल कशी झाली, आपण कोणकोणत्या गोष्टी धाराशिव जिल्हयासाठी शिक्षण क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्या व काळाची गरज ओळखून अलख पांडे यांच्या फिजिक्सवाला सारख्या नामांकित संस्थेच्या साहाय्याने धाराशिव जिल्हयात नवीन शैक्षणिक क्रांती घडवून आणू असा विश्वास तमाम विदयार्थी व पालकांना त्यांनी यावेळी दिला. आपल्या भाषणात फिजिक्स वालाच्या माध्यमातून अभियंत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी म्हणजे नीट व जेईई साठी असलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली किंवा कोटा या ठिकाणी जाण्याची गरज उरणार नाही. फिजिक्स वालाच्या माध्यमातून आपल्याला ‘धाराशिव पॅटर्न’ सुरू करायचा आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ‘फिजिक्स वाला’ या उपक्रमाचे कौतुक देखील केले. तसेच तहसीलदार मॅडम मृणाल जाधव यांनी विद्यार्थ्यांनी कमी गुण व अपयशाने खचून न जाता ध्येय ठेवून फिजिक्स वाला सारख्या उपक्रमाचा फायदा करून घ्यावा असे सांगितले.
नंतर कार्यक्रमांमध्ये फिजिक्स वाला चे अजय चौहान यांनी फिजिक्स वाला ची वाटचाल, क्लासरूम, रिकॉर्डिंग, पी डब्ल्यू ॲप, स्टडी मटेरियल याविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे कष्ट व स्टडी मटेरियल हेच त्यांच्या यशाचे कारण सांगितले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते एस.एस.सी बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यालयातील १७३ विद्यार्थ्यांसह विद्यालयात १००% टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम आलेल्या कु. श्रावणी जयप्रकाश पवार व श्रेयस लालासाहेब पवार, जिल्ह्यातील इतर शाळांमधील पृथ्वीराज भागवत पाटील, गोसावी आसावरी अशोक, अडसूळ कृष्णा विलास, गोरे अक्षरा धनंजय, लटके भाग्यश्री ज्ञानेश्वर तसेच धाराशिव जिल्ह्यातील एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून फ्लाईंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मधील सीबीएसई परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभासाठी व फिजिक्स वालाच्या उद्घाटनासाठी धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, तहसीलदार मृणाल जाधव मॅडम, उप शिक्षणाधिकारी श्री. लांडगे साहेब तसेच ‘फिजिक्स वाला’ चे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या दिमाखदार सोहळ्यात इयत्ता आठवी ते बारावी साठी असलेल्या ‘फिजिक्स वाला’ ऑफलाईन क्लासचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी फिजिक्सवालाचे स्कूल पार्टनरशिप बिझनेस ऑपरेशन हेड अकुंश रुपेला, सेंट्रल अकॅडमी हेड शुभम दुबे, सेंट्रल अकॅडमी हेड अजय चौहान, सिनियर मॅथ्स फॅकल्टीचे प्रवीण अग्निहोत्री तसेच संस्था सदस्य तथा वित्त अधिकारी संतोष कुलकर्णी, संस्थेतील सर्व युनिटचे प्राचार्य संस्थेचे सदस्य व पदाधिकारी तसेच सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस. के. कापसे व एस. सी. पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा































