तुळजापूर ता 14 : मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत, गोंधळ घालत तोडफोड केली. यावर मंदिर संस्थान कडून त्यांच्यावर तुळजापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिर संस्थानद्वारे नियुक्त सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनी SISPL PVT LTD कडून संस्थानास प्राप्त अहवालानुसार अनुप कदम यांनी 13 एप्रिल 2025 रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला. यानंतरच्या घटनेत दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्रीतुळजाभवानी संस्थान यांच्या दालनात कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर संस्थान आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांच्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातल्यानंतर तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांनी कारवाई करण्याचा इशारा समक्षतेत देऊनही त्यास न जुमानता वाद घालत तिथेच बसले. दुसऱ्या अहवालानुसार 15 एप्रिल 2025 रोजी अनुप कदम यांनी श्रीतुळजाभवानी संस्थान कार्यालयातील CCTV कंट्रोल रूम च्या दरवाज्यास लाथ घालून दरवाजा उघडल्याची घटना घडली. सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कंट्रोल रूम मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश देता येत नाही.
हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिर संस्थान प्रशासनाने CCTV फुटेजचे अवलोकन करून वरील घटनांची खात्री केली आणि दिनांक 12 मे 2025 रोजी कारणे दाखवा नोटिस देऊन “मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण होईल असे अशोभनीय वर्तन केल्याने देऊळ कवायत कायदा कलम 24 व 25 नुसार 3 महिन्यांची मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये ?” याचा लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले.
याचा राग मनात धरून अनुप कदम यांनी 13 मे 2025 रोजी पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान केलेल्या अवस्थेत तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांच्या नावे अर्वाच्य भाषेत शिव्या देत गोंधळ घातला. यावेळी मंदिर संस्थान कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच हाताने फोडली. या घटनेनंतर मंदिर संस्थान कडून तुळजापूर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील























