धाराशिव – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचा गंभीर मुद्दा ‘मुरुमायण’ या नावाने जिल्ह्यात गाजत असतानाच, अखेर या प्रकरणाची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे याआधी हात झटकणारे प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे जनतेचे लक्ष खिळले आहे.
मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत काक्रंबा येथील अवैध उत्खननाचा मुद्दा अधिकृतपणे उपस्थित झाला. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
संबंधित कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून मुरुमाची चोरटी वाहतूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाने अद्यापही कारवाईच्या नावाने पानंही उलटलेली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरते आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या या प्रकारात कोणाचे संरक्षण मिळत आहे, हा खरा प्रश्न जनतेच्या मनात आहे.
स्थानिक तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना, “उत्खनन बेकायदेशीररित्या झाले आहे की नाही, याचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. कंत्राटदाराने दोन गटातून परवानग्या घेतल्या असल्याचे समोर आले असून, तहसीलदार अरविंद बोळंगे आणि संबंधित तलाठ्यांना वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे स्पष्ट केले.
या साऱ्या प्रकारावर जनतेचा एकच सवाल आहे — इतक्या दिवसांनी ही हालचाल का? आणि हे ‘मुरुमायण’ फक्त चौकशीच्या फेऱ्यांतच अडकून राहणार की ठोस कारवाईसह पूर्णविराम मिळणार?
प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती, तर आज हा मुद्दा पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची गरजच भासली नसती. आता जेव्हा थेट मंत्र्यांनी लक्ष घातले आहे, तेव्हा जिल्हा प्रशासन खरोखर कार्यवाही करणार का, की पुन्हा नव्या मुरुमायणाची स्क्रिप्ट लिहिण्यात व्यस्त राहणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप




















